भुसावळ- स्व. मोतीभाऊ कपूरचंद कोटेचा यांच्या प्रेरणेतून महावीरकृपा एज्युकेशनल, कल्चरल, स्पोर्टस अकादमीतर्फे कोटेचा स्मृती व्याख्यानमाला 11 ते 13 दरम्यान होणार आहे. या व्याख्यानमालेत दिग्गज व्यक्ती, सिनेस्टार, नामवंत साहित्यीक, लेखक, समाजसेवक यांनी आपली हजेरी लावून व्याख्यानमालेची उंची वाढवली आहे. या व्याख्यानमालेसाठी नियोजन व तयारी सुरू झाली असून नियोजनासाठी नुकतीच अध्यक्षा मोनिका कोटेचा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत सुत्रबध्द नियोजन करण्यात आले.