भुसावळ : शहरातील रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण करून राहत असलेल्या झोपडपट्ट्या प्रचंड पोलीस बंदोबस्तात हटवण्याची मोहिम 12 ते 28 डिसेंबरदरम्यान राबवली जात आहे. अतिक्रमण हटवू नये यासाठी काही संघटनांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. शहरातील आगवाली चाळ भागातील अतिकमण 12 ते 14 डिसेंबरदरम्यान हटवण्यात येणार आहे तर हद्दीवाली चाळ भागात 19 ते 21 व चांदमारी चाळ भागात 26 ते 28 डिसेंबर दरम्यान अतिक्रमण हटाव मोहिम राबवली जाणार आहे.
रेल्वे प्रशासन रेल्वे सुरक्षा बलासह स्थानिक पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात मोहिम राबवणार आहे तर अतिक्रमितांच्या घरांवर रेल्वे प्रशासनाने नोटीसा डकवल्या आहेत. अतिक्रमण हटवण्यासाठी यापूर्वीच रेल्वे प्रशासनाने अतिक्रमितांना मुदत दिली होती मात्र आता अतिक्रमण कुठल्याही परीस्थितीत निघेल, कुणीही कायदा हातात घेऊ नये, असे रेल्वे डीआरएम आर.के.यादव यांनी सांगितले.