भुसावळ – महाशिवरात्रीनिमित्त शहरातील नुपूर कथ्थक डान्स अॅकेडमीतर्फे गेल्या 20 वर्षांपासून नुपूर महोत्सवाचे आयोजन केले जात असून यंदाही मंगळवारी सायंकाळी 7.30 वाजता कृष्णचंद्र सभागृहात कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमात नुपूरचे विद्यार्थी कथ्थक नृत्य तर प्रमुख पाहुणे सत्यजित देवनाथ रघुवंशकुमार, तेजराम पाटील हे खैरागड विद्यापीठाचे प्राध्यापक अनुक्रमे भरतनाट्यम, ओडीसी व कथ्थक नृत्याचे सादरीकरण करतील, अशी माहिती नुपूरचे संचालक रमाकांत भालेराव यांनी पत्रकार परीषदेत दिली. याप्रसंगी डॉ.नरेंद्र भोलाणे यांची उपस्थिती होती.
स्व.निळकंठ पंढरपूरकर स्मृती शिष्यवृत्ती
कला व संस्कृतीच्या प्रचार व प्रसारासाठी स्व.निळकंठ पंढरपूरकर स्मृती शिष्यवृत्ती या वर्षापासून सुरू करण्यात आली आहे. डॉ.नरेंद्र भोलाणे व सुनील पाठक यांनी त्यासाठी पाठपुरावा केल्याने नुपूरला 50 हजारांची देणगी दिली आहे. यंदाच्या महोत्सवापासून स्मृतीप्रित्यर्थ चित्रकला व शास्त्रीय नृत्य शिकणार्या पाच होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्ती एका वर्षासाठी देण्यात येणार आहे.