रोटरी क्लब आणि जय गणेश फाउंडेशनचा उपक्रम
भुसावळ : जय गणेश फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयल्स तर्फे 15एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तपेढ्यांमध्ये रक्त बॅगचा तुटवडा होऊ नये यासाठी भुसावळ शहरातील जय गणेश फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयल्स च्या संयुक्त विद्यमाने संतोषी माता हॉलमध्ये सोशल डिस्टन्स पाळून 15 रोजी सकाळी 11 ते 1दरम्यान रक्तदान शिबिर होत आहे.
रक्तदात्यांना मिळणार पास
ऐसपैस जागेमुळे सोशल डिस्टनसींग व 144 कलमाचे पालन होणार आहे तसेच रक्तदात्यांना संचारबंदी काळात येण्या-जाण्यासाठी पासेस उपलब्ध करून दिले जाणार आहेत. शहरातील बहुसंख्य रक्तदात्यांनी रक्तदान करून या सामाजिक कार्यास हातभार लावावा, असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष रो.उमेश नेमाडे, सचिव रो.राजेंद्र यावलकर, जय गणेश फाउंडेशन चे समन्वयक रो. अरुण मांडळकर, रो.गणेश फेगडे आणि प्रकल्प प्रमुख रो.सर्फराज तडवी यांनी केले आहे.