भुसावळ- शहरातील लोणारी समाज मंगल कार्यालयात महाराष्ट्र राज्य परीट (धोबी) सेवा मंडळातर्फे वधू- वर परीचय मेळाव्याचे गुरुवार, 15 रोजी आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय धोबी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी शिंदे असतील. याप्रसंगी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, भाजपा प्रदेश सरचिटणीस डॉ.रामदास आंबटकर, उत्तरप्रदेशचे माजी खासदार कमलकिशोर कमांडो, आमदार संजय सावकारे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास उपस्थिती द्यावी, असे आवाहन आयोजक तथा जिल्हाध्यक्ष कैलास शेलोडे, संस्थाध्यक्ष रमेश ठाकरे, गोपाळ बाविस्कर, लक्ष्मण शेलोळे, नरेंद्र वाघ आदींनी केले आहे.