भुसावळात 18 व 19 रोजी क्रीडा स्पर्धा

0

भुसावळ- शहरातील महाराणा प्रताप विद्यालयात 18 व 19 रोजी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून सकाळ व दुपार सत्रात या स्पर्धा होणार आहेत. दोन दिवसात लांब उडी, अडथळा शर्यत, दोरीवरील उड्या, शंभर मीटर धावणे, संगीत खुर्ची, खो-खो, कबड्डी आदी स्पर्धा होणार आहेत. कार्यक्रमास डॉ.अभय कोटेचा प्रमुख उपस्थित राहतील. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक शिंदे, पर्यवेक्षिका मोरे यांनी नियोजन केले आहे. संस्थाध्यक्ष सोनू मांडे यांच्यासह धीरज वाघमारे आदींची उपस्थितीदेखील राहणार आहे.