जागतिक आपत्तीत राष्ट्रसेवेचे आयोजकांचे आवाहन
भुसावळ : सर्वत्र कोरोनाच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. विविध शस्त्रक्रिया आणि आजारी रूग्णांना रक्ताची गरज असते. याच दरम्यान राज्यातील रुग्णांसाठी रक्ताची मागणी वाढली आहे परंतु पाहिजे त्याप्रमाणे ते उपलब्ध होत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच रक्तदान शिबिरांची आवश्यकता बोलून दाखविली होती. राज्यात रक्ताचा तुटवडा होण्याची शक्यता असल्याने रक्तदानाचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत शहरातील प्रा.धीरज पाटील, बबलू बर्हाटे, सुरज पाटील यांच्या समन्वयातून शहरातील श्री रीदम हॉस्पिटल येथे श्रीराम नवमीला येथे 2 एप्रिल 2020 रोजी सकाळी 7 ते 10 दरम्यान रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
मोफत प्राथमिक आरोग्य तपासणी
या शिबिरात सहभागी होणार्या दात्याचे वजन, रक्तदाब, इसीजी तसेच प्राथमिक आरोग्य तपासणी श्री रीदम रुग्णालयातर्फे मोफत केली जाणार आहे. या तपासणी नंतरच रक्तदान स्वीकारले जाणार आहे. जागतिक आपत्तीत संचारबंदी असतांना रक्तादान शिबिराचे भुसावळ शहरातील डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शेतकरी, पत्रकार, महिला व तरुण मंडळनीने स्वागत केले आहे. दिवसभरात टप्याटप्याने सर्वच रक्तदान करतील. राज्यातील रुग्णांची रक्ताची गरज भागविण्यासाठी हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून यात अधिकाधिक संख्येने दात्यांनी सहभागी होऊन राष्ट्रसेवेत योगदान द्यावे असे, आवाहन समन्वयकांनी केले आहे.
सोशल डिस्टन्स ठेवून शिबिराचे आयोजन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर आणि स्वच्छता बाळगत रक्तदान केले जाईल. रक्तदान शिबिरात एकावेळी चार दात्यांचे रक्त स्विकारले जाणार आहे. सकाळी 7 ते 10 या दरम्यान शिबिर होणार आहे. अधिक माहितीसाठी प्रा. धीरज पाटील (7709044904) बबलू बर्हाटे (9823321999) व सुरज पाटील (7588647190) यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या शिबिरात रक्तदात्यांची अत्यंत सुरक्षितपणे आवश्यक त्या सर्व वैद्यकीय चाचण्या करूनच रक्त घेतले जाणार आहे. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगबाबतही विशेष काळजी घेतली जाईल. दोन रक्तदात्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यात येईल शिवाय, स्वच्छतेची विशेष खबरदारी घेतली जाणार असल्याचे समन्वयक प्रा.धीरज पाटील यांनी सांगितले.