भुसावळात 2 जानेवारी रोजी डॉक्टर पाळणार काळा दिवस

0
भुसावळ : नॅशनल मेडीकल कमीशन विधेयकाविरोधात डॉक्टर मैदानात उतरल्यानंतर सरकारचा विरोध करण्यासाठी देशभरातील डॉक्टर 2 जानेवारी रोजी काळा दिवस पाळणार असून संपावरही जाणार आहे. भुसावळ येथील इंडियन मेडीकल असोसिएशनने संपाला पाठींबा देत काळा दिवस पाळणार असल्याचे कळवले आहे. निवेदनावर आयएमएचे अध्यक्ष डॉ.दीपक जावळे, खजिनदार डॉ.प्रसन्ना जावळे, सचिव डॉ.मिलींद एम.पाटील यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.