भुसावळ : भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे रविवार, 27 मार्च 2022 रोजी बिसारा लेडीज इक्वलिटी रन सीजन- 2 चे आयोजन करण्यात आले आहे. तीन किमी, पाच किमी व दहा किमी या तीन श्रेणींमध्ये या रनचे आयोजन करण्यात आले आहे. 12 वर्षांवरील सर्व मुली व महिलांसाठी ही स्पर्धा खुली असल्याचे संयोजिकाद्वय डॉ.नीलिमा नेहेते व डॉ.चारुलता पाटील यांनी सांगितले.
नाव नोंदणीला सुरूवात
ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने नावनोंदणी करता येईल. नावनोंदणी गुरुवार, 3 मार्चपासून सुरू होणार आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी ुुु.लर्हीीरुरश्रीरीर.लेा या संकेतस्थळावर व ऑफलाईन नोंदणीसाठी सुप्रभा एक्सिडेंट हॉस्पिटल व डॉ.संजय नेहेते हॉस्पिटल त्याचबरोबर योगशिक्षिका पुनम भंगाळे यांच्या गोदावरी नगरातील निवासस्थानी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सहभागी प्रत्येक महिला स्पर्धकास टी-शर्ट, पदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. त्याचबरोबर स्पर्धेच्या दिवशी ठरावीक अंतरावर स्पर्धकांसाठी पाणी, पेयजल, फळांची व्यवस्था करण्यात येणार आहे. रन पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक स्पर्धकासाठी नाश्त्याची व्यवस्था असेल या शिवाय या आयोजनाचे वैशिष्ट्य म्हणजे सहभागी प्रत्येक स्पर्धकास 20 दिवस मोफत धावण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. त्यासाठी दर मंगळवार, गुरुवार व रविवारी सकाळी 5.45 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर (डी.एस. ग्राउंड) उपस्थित रहावे, असे आवाहन प्रवीण फालक यांनी केले आहे. रविवार, 6 मार्च रोजी प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात येईल. याप्रसंगी धावण्याच्या आधी करायचा वॉर्मअप, धावताना घ्यावयाची खबरदारी व धावल्यानंतर संभाव्य इजा टाळण्यासाठी आवश्यक असलेली स्त्रेचींग एक्सरसाइजची संपूर्ण माहिती देण्यात येईल.
या स्पर्धकांना नव्याने नाव नोंदणी गरजेची नाही
गतवर्षी कोरोनामुळे 7 मार्च रोजी आयोजित स्पर्धा पुढे ढकण्यात आली व त्यावेळी नाव नोंदणी केलेल्या महिला स्पर्धकांना नव्याने नावनोंदणी करण्याची आवश्यकता नाही, प्रवीण पाटील यांनी सांगितले. यावेळी डॉ..स्वाती फालक, डॉ.चारुलता पाटील, डॉ.नीलिमा नेहेते, आरती चौधरी, ममता ठाकूर, पूनम भंगाळे, सीमा पाटील, मिनी जोसेफ, निलांबरी शिंदे, छाया चौधरी, पूजा बलके, सरला पाटील, प्रिया पाटील, हर्षा लोखंडे, चारुलता अजय पाटील, रूपा अग्रवाल, विजया पाटील, पल्लवी देशमुख या महिला धावपटू उपस्थित होत्या.