भुसावळ : रोटरी क्लब भुसावळ रॉयल्सतर्फे इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी ‘मार्ग यशाचा वेध भविष्याचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन 29 रोजी करण्यात आले आहे. यामध्ये भुसावळ येथील वेलनेस फाऊंडेशनचे संचालक निलेश गोरे हे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक क्षेत्राबद्दल सखोल माहिती देतील आणि विद्यार्थी व पालक यांच्या शंकांचे निरसन करतील. जेणेकरून भविष्यातील यशस्वी व्यक्तिमत्व साकारण्यास विद्यार्थ्यांना मदत होईल. त्याचप्रमाणे कार्यक्रमात राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते रणजीतसिंह राजपूत हे विद्यार्थ्यांना ‘मी कसा घडलो’ या विषयाद्वारे त्यांच्या यशाचे रहस्य सांगणार आहे. हा कार्यक्रम रविवार, 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता चक्रधर नगर, भुसावळ येथील रोटरी भवनात होईल. कार्यक्रमात जास्तीत-जास्त संख्येने विद्यार्थी व पालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष राजेंद्र यावलकर, सचिव विनोद तायडे, प्रकल्पप्रमुख प्रसन्न पांडे व प्रायोजक सौरभ अग्रवाल यांनी केले आहे.