भुसावळात 46 जणांकडून रक्तदान

0

भुसावळ : राज्यातील रक्ताची मागणी आणि मुख्यमंत्री तसेच आरोग्यमंत्री यांनी रक्तदान करण्यासाठी केलेले आवाहन याला प्रतिसाद देऊन भुसावळात रक्तदान करण्यात आले. आज गुरुवारी रक्तदानासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रा.धीरज पाटील , बबलू बऱ्हाटे आणि सुरज पाटील यांच्या समन्वयाने शहरातील श्री रिदम हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात 46 रक्तदात्यांनी रक्तदान केले. धनवंतरि ब्लड बँकेचे सहकार्य लाभले. एकावेळी ४ दात्यांचे रक्त स्वीकाराले गेले.
श्री रिदम रुग्णालयात रक्तदानासाठी आलेल्या व्यक्तीचे प्राथमिक तपासणी करण्यात आली. त्यानंतरच रक्तदान करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतली काळजी
रक्तदान करण्यासाठी अनेक जण इच्छित होते .पण रक्तदाते निवडतांना काळजी घेण्यात आली. सर्व दाते भुसावळ शहरातीलच असून गेल्या महिनाभरात जे नागरीक बाहेर गावी गेले नाहीत.
या रक्तदान शिबिरात डॉ. नितीन पाटील, डॉ. गणेश पाटील,डॉ. लक्ष्मीकांत नागला , डॉ. प्रवीण महाजन यांनी रक्तदात्यांची तपासणी केली.शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री रिदम मेडिकलचे गौतम चोरडिया ,गणेश पाटील, मृगेन कुलकर्णी , स्वप्नील पवार,अविनाश यादव , गौरव पवार , संदिप महाजन , धनराज ठाकूर व पवन नाले यांनी परिश्रम घेतले.
रेल्वे कामगार सेनेचे ललित मुथा, सिध्दीविनायक इन्फोटेकचे यतिन ढाके, सुराणा गृपचे अशोकचंद सुराणा, कृ.उ. बा. समिती सद्स्य जयंतीलाल सुराणा अनेक समाजसेवक यांनी भेट याठिकाणी भेेेट दिली.