भुसावळ- सेवाभावी वृत्ती व समाज कार्याची ओढ असलेले श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्टचे चेअरमन अनिल गंगाधर पाटील यांचे सोमवार, 25 फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने लेवा समाजाची मोठी अपरीमित हानी झाली असून त्यांच्या उत्तर कार्यानिमित्त वै.हभप झेंडूजी महाराज बेळीकर परंपरेच्या विचाराने चार दिवसीय नामसंकीर्तन सोळ्याचे पाटील परीवार व महालक्ष्मी ग्रुपतर्फे 6 ते 9 दरम्यान राम मंदिर वॉर्डात आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, 6 रोजी रोजी दुपारी एक वाजता हभप भरत महाराज यांचे प्रवचन, गुरुवार, 7 रोजी हभप प्रल्हाद ढाके (सर) यांचे रात्री आठ वाजता कीर्तन तर शुक्रवार, 8 रोजी हभप किशोर महाराज तळवकर यांचे रात्री आठ वाजता कीर्तन तसेच शनिवार, 9 रोजी हभप दीपक महाराज, शेळगावकर यांचे सकाळी 10 वाजता कीर्तन होणार आहे. कीर्तन, श्रवणाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.