भुसावळात 71 हजारांची घरफोडी

Daring burglary of 71 thousand in Bhusawal भुसावळ : शहरातील खडका रोड, लाल बिल्डिंग भागात घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी 71 हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

घर बंद असल्याची साधली संधी
तक्रारदार मोहम्मद उसामा मोहम्मद खालीद (30, लाल बिल्डींग, खडका रोड, भुसावळ) हे कामानिमित्त बाहेर गेल्याने घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधत सुमारे 71 हजारांचा ऐवज लांबवला. चोरट्यांनी कपाटातून 30 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत, नऊ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मणी, 27 हजार रुपये किंमतीच्या तीन सोन्याच्या अंगठ्या असा एकूण 71 हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला. मोहम्मद खालीद घरी आल्यानंतर त्यांच्या चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलिसांना माहिती दिली. तपास हवालदार गणेश चौधरी करीत आहेत.