भुसावळ आयटीआयमधील विद्यार्थ्यांना स्किल कॉम्पिटिशनमध्ये डावलले

0

भुसावळ- कौशल्य आणि उद्योजकता विकास विभागातर्फे नाशिक येथे 7 मे रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टेट स्किल कॉम्पिटीशनमध्ये भुसावळ शासकिय आयटीआयच्या विद्यार्थ्यांना डावल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी आमदार संजय सावकारे यांच्याकडे सोमवारी केली. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य आणि उद्योजकता विकास विभागातर्फे 7 मे रोजी नाशिकच्या सातपुर येथील शासकीय आयटीआयमध्ये महाराष्ट्र स्टेट स्कील कॉम्पिटीशन अंतर्गत परीक्षा घेण्यात आली. यात भुसावळ येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील 20 विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून ही परीक्षा दिली. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कोपा ट्रेडच्या 10 विद्यार्थ्यांनी आयटी नेटवर्क सिस्टीम ऍनमिनीस्ट्रेशन’ या स्कील अंतर्गत, मशिनीस्ट ट्रेड, बेकरी, वेल्डर ट्रेडच्या विद्यार्थ्यांनी स्कील अंतर्गत परीक्षा दिली. त्यात सात विद्यार्थी मेरीटमध्ये आल्याचे तोंडी सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना लेखी निकाल दाखविण्यात आला नाही तर पुढील परीक्षा 14 मे रोजी मुंबईत होणार असल्याचे सांगण्यात आले मात्र विद्यार्थ्यांना ही माहिती कळविण्यात आली नाही. विद्यार्थ्यांनी इंटरनेटवर परीक्षेचा निकाल पाहिला असता त्यात मेरीटमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची नावेच प्रसिध्द झालेली नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी आमदार संजय सावकारे यांच्याकडे केली आहे.