वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा
भुसावळ- भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व युवा नेते असलेल्या सचिन संतोष चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तसेच दूरध्वनी व सोशल मिडीयावरून शुभेच्छांचा वर्षाव केला. रावेरचे उद्योजक श्रीराम पाटील यांनी माजी आमदार संतोष चौधरी सियाराम कॉम्प्लेक्समधील निवासस्थानी सचिन चौधरी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून हजेरी लावली. या शिवाय माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल छबीलदास चौधरी, माजी नगराध्यक्ष शीतल पाटील, प्रा.गोपाळ दर्जी, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, धीरज चौधरी यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.