भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी सचिन चौधरींची वर्णी

0

उत्पन्न वाढवण्यासोबतच समितीला राज्यात नावारूपाला आणणार -सचिन चौधरी

भुसावळ- भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सचिन संतोष चौधरी यांची शनिवारी झालेल्या विशेष सभेत बिनविरोध निवड करण्यात आली. तत्कालीन सभापती सोपान भारंबे यांनी तीन वर्षांच्या कार्यकाळानंतर पदाचा राजीनामा दिल्याने रीक्त पदासाठी शनिवारी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. सचिन चौधरी यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी त्यांचा सत्कार केला तसेच संचालकांनीही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

यांची होती उपस्थिती
जिल्हा परीषद सदस्य रवींद्र नाना पाटील, माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी, माजी सभापती सोपान भारंबे, उपसभापती अशोक पंडित पाटील, उमा वसंत पाचपांडे, सुभाष राजाराम पाटील (सुनसगाव), राजेश भैय्याजी जोशी (कुर्‍हे), प्रमिला पंढरीनाथ पाटील, इंदुबाई श्रीधर महाजन,कोकिळाबाई मनोहर पाटील, डिगंबर सुभाष कोल्हे, गजानन गोपाळ सरोदे, नारायण लालचंद सपकाळे, नरेंद्र बद्रीचंद अग्रवाल, जयंतीलाल शांतीलाल सुराणा, कैलास विठ्ठल गभाने, आशिक खान शेरखान, सुभाष पाटील (कुर्‍हेपानाचे) यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कृउबा नावारूपाला आणणार -सचिन चौधरी
भुसावळातील व्यापार्‍यांना सोबत घेवून कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यात नावारूपाला आणणार असून समितीचे उत्पन्न वाढवण्यावर भर राहणार असल्याची ग्वाही नूतन सभापती सचिन संतोष चौधरी यांनी दिली. ते म्हणाले की, महामार्गावर कृउबासाठी आरक्षित जागा असून या भव्य जागेत लवकरच कृउबाचे स्थलांतर करून शेतकर्‍यांना सोयी सुविधा पुरवल्या जातील. माजी आमदार संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकर्‍यांसाठी दोन वर्ष विविधांगी उपक्रम राबवण्याचीही त्यांनी ग्वाही दिली.