भुसावळ- जुन्या वादातून शहरातील पंचशील नगरातील 28 वर्षीय युवक आनंद अशोक वाघमारेचा खून प्रकरणी अटकेतील आरोपी प्रल्हाद होलाराम सचदेव (भुसावळ) याने बुधवारी पोलिसांना गुन्ह्यात वापरलेला चाकू काढून दिला. आरोपीने रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास खून आनंदचा खून केल्यानंतर कुर्हेपानाचे रस्त्यावरील हॉटेल रावणमधून पाण्याची बाटली विकत घेतली व हॉटेलमागील एका शेतात त्याने मद्य प्राशन केले तसेच गुन्ह्यात वापरलेला चाकू त्याने खड्ड्यात पुरला होता तो त्याने दोन शासकीय पंचांसमक्ष काढून दिला. याप्रसंगी तपासाधिकारी उपनिरीक्षक अनिस शेख, उपनिरीक्षक मनोज ठाकरे उपस्थित होते. दरम्यान, आरोपीची 10 रोजी पोलीस कोठडी संपणार असल्याने त्यास गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.