भुसावळ गटनेता प्रकरणी पुन्हा तारीख पे तारीख

0

आता पुढील सुनावणी 12 मार्च रोजी

भुसावळ– भाजपाकडे पुरेसे संख्याबळ असतांनाही भाजपाच्या चिन्हावर निवडून न आलेल्या व अपक्ष नगरसेवक असलेल्या हाजी मुन्ना इब्राहिम तेली यांना पालिकेतील सत्ताधार्‍यांनी गटनेता बनवल्याने सर्वांना अपात्र करण्यात यावे, अशी याचिका पालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या जनआधार विकास पार्टीने जिल्हाधिकार्‍यांकडे दाखल केली होती. या याचिकेची दखल घेत जिल्हाधिकार्‍यांनी लोकनियुक्त नगराध्यक्षांसह भाजपाच्या 29 नगरसेवकांना अपात्र का करण्यात येवू नये? या आशयाची नोटीस बजावली होती. गत डिसेंबरपासून सुरू असलेल्या तारीख पे तारीखनंतर सोमवारी हजर राहिलेल्या पदाधिकार्‍यांना पुन्हा 12 मार्च ही सुनावणीची तारीख देण्यात आली आहे. सत्ताधारी गटातर्फे गटनेते मुन्ना तेली, अ‍ॅड.बोधराज चौधरी तर जनआधारतर्फे गटनेता उल्हास पगारे व दुर्गेश ठाकूर उपस्थित होते.