भुसावळ गोळीबार प्रकरण; आरोपी अक्षय सोनवणेला पोलीस कोठडी

0

दोन कट्ट्यांसह दोन काडतूस बाजारपेठ पोलिसांनी केले जप्त

भुसावळ- व्याजाच्या पैशांच्या वादातून नाहाटा चौफुलीजवळील एका हॉटेलजवळ एकावर गोळीबार करून जखमी केल्याची घटना 27 मे रोजी घडली होती. या प्रकरणी मुख्य संशयीत अक्षय सोनवणे यास अटक करण्यात आली होती. आरोपीकडून पोलीस कोठडीत दोन पस्तुलासह दोन काडतुसे जप्त करण्यात आली होती तर सोमवारी त्यास न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास नाहाटा चौफुलीवरील हॉटेल गजाननजवळ उभ्या असलेल्या सागर पत्की यांच्यावर गोळीबार केल्या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली होती. अधिक तपास उपनिरीक्षक विजय नरवाडे करीत आहेत.