भुसावळ : भुसावळ बसस्थानकात झालेल्या गोळीबार प्रकरणी मुख्य आरोपीसह त्याचा साथीदार बाजारपेठ पोलिसांना रविवारी रात्री शरण आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. घटनेबाबत माहिती अशी की, गुरुवारी रात्री बसस्थानकातील शौचालयात भाजी विक्रेता दीपक काटकर हा शौचास आल्यानंतर अजय गोडालेसह त्याचा साथीदार किसन पचेरलवाल हा मद्यपान करीत असताना गावठी कट्याच्या धाकावर गोडाले याने बसस्थानकात हवेत गावठी कट्याची एक फैर झाडत दहशत निर्माण केली होती व काटकर यास मद्यप्राशन करण्यास भाग पाडले होते. सहकार्यावर रुबाब झाडण्यासाठी त्याने सचिन सोनवणे नामक आपल्याच साथीदाराच्या डाव्या हाताच्या दंडावद एक गोळी झाडली होती यात तो जखमी झाला होता. या घटनेनंतर आरोपी गोडालेने एका अल्पवयीन आरोपीची मदत घेत मुक्ताईनगरकडे पलायन केले होते. जखमी सचिनला सोडत आरोपी मराठवाड्याकडे पळाल्याने पोलिसांपुढील ताण वाढला होता तर आरोपींच्या शोधार्थ चार पथक रवाना करण्यात आले होते.
दोन दिवसांनी आरोपी आले शरण
शौचास आलेल्या दीपक काटकरला ओलीस ठेवत आरोपींनी एकाच दुचाकीवर वरणगावकडे धूम ठोकली होती तर पोलिसही या घटनेने चक्रावले होते. दीपक काटकरचा आरोपी गेम करण्याच्या प्रयत्नात असतानाच दीपकने जीवाच्या आकांतने धूम ठोकत पोलिसांना माहिती दिल्याने त्याचे प्राण वाचले होते तर पोलीस कर्मचारी प्रदीप पाटील यांनी समय सूचकता दाखवल्याने या घटनेची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पत यांनी कळवल्याने त्यांनी लागलीच दखल घेतल्याने दीपक काटकर यांची फेकरी टोल पुलाजवळून सुटका केल्याने घटनेचा उलगडा झाला होता. ही बाब उघडकीस येण्यासाठी गुरुवारचे रात्रीचे 11.30 वाजल्याने पोलिसांपुढील पेच वाढला होता. आरोपींच्या शोधार्थ पोलिसांचे चार पथक रवाना झाले होते मात्र रविवारी रात्री आरोपी स्वतःहून बाजारपेठ पोलिसांना शरण आले. त्यात मुख्य आरोपी अजय गोडालेसह त्याचा साथीदार किसन पचेरवालचा समावेश असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. बाजारपेठ पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्याच्या माहितीला बाजारपेठ पोलिसचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी दुजोरा दिला.