भुसावळ चाकू हल्ल्यातील आरोपींना कोठडी

0

भुसावळ- शहरातील नाहाटा चौफुलीजवळील दीनदयाल नगर रीक्षा स्टॉपजवळ खुशाल संजय दराडे (22, श्रीराम नगर, वांजोळा रोड, भुसावळ) हा मित्रासह उभा असताना संशयीत आरोपी अमोल राणे, आकाश राजपूत व विशाल घेंगट यांनी तुम्ही दादा झाले का, आम्हाला नमस्कार का केला नाही? असे म्हणत वाद घालून खुशाल दराडेवर चाकू हल्ला केला होता. आरोपींनी दराडे यांच्या मानेजवळील कंठावर तीन वार केल्याने ते रक्तबंबाळ झाल्याची घटना गुरुवार, 28 रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी आरोपी अमोल राणे व विशाल घेंगट यांना अटक करण्यात आली होती. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या गुन्ह्यातील आकाश राजपूत हा संशयीत पसार झाला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश शिंदे करीत आहेत.