खान्देशातील तहसीलदारांच्या बदल्या : तातडीने पदभार सोडण्याचे आदेश
भुसावळ (गणेश वाघ)- खान्देशसह राज्यातील 18 तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश शासनाचे सहसचिव मा.आ.गुट्टे यांनी 23 रोजी काढले असून बदलीस्थळी अधिकार्यांनी तातडीने रूजू व्हावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. भुसावळ तहसीलदारपदी बोदवडचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांची बदली झाली असून मुक्ताईनगर तहसीलदार रचना पवार यांची नाशिक जि.का.तहसीलदार (सर्वसाधारण) पदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी अक्राणी, जि.नंदुरबार येथून शाम वाडकर बदलून येत आहेत. एरंडोल तहसीलदार सुनीता जर्हाड यांची नवापूर तहसीलदारपदी तर पारोळा तहसीलदार वंदना खरमाळे यांची ईगतपुरी तहसीलदारपदी बदली झाली आहे.
धुळ्यासह नंदुरबार जिल्ह्यातील अधिकार्यांच्याही बदल्या
धुळे महसूल तहसीलदार दत्तात्रय एकनाथ शेजूळ यांची देवळा, जि.नाशिक येथे तहसीलदारपदी तर दोंडाईचा अपर तहसीलदार रोहिदास वारूळे यांची येवला तहसीलदारपदी बदली झाली. नंदुरबार महसूल तहसीलदार प्रमोद हिले यांची बागलाण तहसीलदारपदी तसेच नंदुरबार तहसील कार्यालयातील संजय गांधी योजनेचे एम.डी.बारेकर यांची अक्राणी, जि.नंदुरबार येथे तहसीलदारपदी व सरदार सरोवर पुर्नवसनच्या तहसीलदार गायत्री सौंदाणे यांची धुळे अपर तहसीलदारपदी बदली करण्यात आली आहे.