भुसावळ तहसीलदारांच्या बनावट शिक्क्यासह स्वाक्षरीचा वापर करीत कर्जदाराचे प्लॉट परस्पर विकले : 11 जणांविरोधात गुन्हा

भुसावळ : बिनशेती खुले बखळ प्लॉट तसेच जागा व स्थावर मिळकत मिनीचे सातबारा उतार्‍याचे विभाजन न करता व तुकडा न पाडता विभाजन करून त्यांची परस्पर विक्री केल्या प्रकरणी पतसंस्थेच्या वसुली अधिकार्‍यांसह 11 जणांविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, हा प्रकार करताना भुसावळ तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीसह शिक्क्यांचा वापर झाला आहे. दरम्यान, अशा पद्धत्तीने फसवणूक करणारी मोठी लॅण्ड माफियांची टोळी शहरात सक्रिय झाल्याची चर्चा असून पोलिस उपअधीक्षक अत्यंत बारकाईने या प्रकरणाचा तपास करीत असल्याने लॅण्ड माफियांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

बनावट आदेशाद्वारे केली प्लॉट विक्री
श्री जनकल्याण अर्बन को.ऑपक्रेडीट सोसायटीच्या मालकीच्या फेकरी शिवारातील सर्व्हे नंबर 3/4 मधील प्लॉट 1,4,5,व 6 हे संस्थेचे विशेष वसूली अधिकारी रवींद्र गोपाळ धांडे (रा.भुसावळ) यांनी विक्री केल्याची बाब उघड झाली आहे. विशेष म्हणजे भुसावळ तहसीलदार यांची बनावट सही व शिक्का तयार करून हे प्लॉट विक्री झाले असून शासनाची फसवणूक केली म्हणून यात धांडेसह प्लॉट घेणार्‍या 10 जणांविरूध्द येथील शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांच्याविरूध्द दाखल झाला गुन्हा
22 डिसेंबर 21 ते 27 मार्च 22 या काळात खरेदी केलेल्यांविरूध्द पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात मनिषा कैलास कोळी (रा.फेकरी), राजेंद्र अमृत तायडे (रा.बजरंग कॉलनी, गांधी नगर, भुसावळ), उमेश विकास बर्‍हाटे (रा.जुना वरणगाव रोड,फेकरी), दीपाली अनिल साोनवणे (रा.खडकारोड, नेमाडे कॉलनी, भुसावळ), प्रशांत बळीराम पाटील (रा.जगदंब नगर, वरणगाव), किरण भीमराव तायडे (रा.आंबेडकर नगर, वरणगाव), अक्षय प्रमोद जैस्वाल (रा.बामणोद, ता.यावल), कैलास सुधाकर पाटील (रा.निंभोरा बुद्रूक, भुसावळ), पुष्पा राजेंद्र मसराम, राजेंद्र रामचंद्र मसराम (रा.फेकरी, भुसावळ)यांनी प्लॉट घेतले तर खरेदी करून देणार रवींद्र गोपाळ धांडे (रा.तुळशीनगर, भुसावळ) यांनी संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार करून तहसील दारांचा बनावट शिक्का, सही केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.