भुसावळ तहसीलदारांच्या बनावट आदेशाने प्लॉट विक्री प्रकरण : तलाठी पोलिसांच्या रडारवर

Plot sale case with fake order of Bhusawal Tehsildar: Talathi on police radar भुसावळ : भुसावळ तहसीलदारांच्या बनावट आदेश प्रकरणात पोलिसांनी सखोल तपासाला वेग दिला आहे. भुसावळ तालुक्यातील तलाठ्यांचे जबाब आता शहर पोलिसांकडून नोंदवण्यात येत असल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

बनावट आदेशाने प्लॉटची विक्री
भुसावळ जनकल्याण अर्बन संस्थेचे विशेष वसुली अधिकारी रवींद्र धांडे यांनी तहसीलदारांच्या बनावट आदेशाद्वारे संस्थेचे दहा प्लॉट परस्पर विक्री केले. ही बाब उघडकीस आल्यानंतर धांडेसह संस्थेचे प्लॉट घेणार्‍या दहा जणांविरूध्द भुसावळ शहर पाोलिस ठाण्यात रविवार, 17 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आता भुसावळ शहर पोलिसांनी तलाठ्यांचे जवाब नोंदवण्यास सुरूवात केली आहे. शुक्रवारी तीन तलाठ्यांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांचे जबाब नोंदवण्यात आले. तपास डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अंबादास पाथरवट तपास करीत आहे.