भुसावळ तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत बियाणी स्कूलचे वर्चस्व

0

भुसावळ- शालेय शासकीय तालुका स्तरीय मुलांच्या मैदानी स्पर्धा बियाणी मिलिटरी स्कूलच्या मैदानावर झाल्या. या स्पर्धेत बियाणी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वर्चस्व मिळवले. स्पर्धेचे उद्घाटन बियाणी एज्युकेशनल संस्थेच्या सचिव संगीता बियाणी यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शालेय पोषण आहार अधीक्षक सुमित्र अहिरे होते. प्राचार्य डी.एम.पाटील, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप साखरे, तालुका सम्मनवयक बी.एन.पाटील, क्रीडा शिक्षक रमण भोळे, आर.आर.धनगर, विलास पाटील, राजु कुलकर्णी, रुपा कुलकर्णी व सर्व क्रीडा शिक्षक खेळाडू उपस्थित होते. सूत्रसंचालन मधुकर वाणी यांनी तर आभार एस.डी.बावसकर यांनी मानले.

स्पर्धेचा निकाल असा
14 वर्ष आतील धावणे स्पर्धा- प्रथम- यश नारखेडे, द्वितीय- अमर बारेला, दोनशे मीटर धावणे, प्रथम- जावेद तडवी, द्वितीय- सौरभ माळी, चारशे मीटर धावणे, प्रथम- अमर बारेला, द्वितीय- लखन मोहिते, सहाशे मीटर धावणे, प्रथम- हेमंत सोनवणे, द्वितीय- अफराज तडवी.

चार बाय शंभर मीटर रीले- प्रथम- ताप्ती पब्लिक स्कुल, 80 मीटर हर्डल्स, प्रथम- कैलाश पाटील व द्वितीय- यश ठोंबरे, लांब उडी, प्रथम- हरप्रीतसिंग रंधवा, द्वितीय- पवन चव्हाण.

उंच उडी, प्रथम- दुर्वेश पाटील, द्वितीय- हरप्रीतसिंग रंधवा, गोळा फेक- प्रथम-कृष्णा भारंबे, द्वितीय- जावेद तडवी, थाळी फेक- प्रथम- वेदांत पाटील, द्वितीय- वरवत मोहिते.

17 वर्षे आतील शंभर मीटर धावणे, प्रथम- मुजमील खान, द्वितीय- महमंद तडवी, दोनशे मीटर धावणे- प्रथम- अतुल दांडगे, द्वितीय- पियुष फेगडे , चारशे मीटर धावणे- प्रथम- देवा पवार, द्वितीय- अत्तरसिंग पावरा, आठशे मीटर धावणे- प्रथम- विवेक बोंडे, द्वितीय- रोहित पाटील, 1500 मीटर धावणे- प्रथम- उज्वल कोल्हे, द्वितीय- रोशन जाधव , तीन हजार मीटर धावणे- प्रथम- महेश तळेले, द्वितीय- दिवाकर पाटील, शंभर मीटर हर्डल्स- आओम चौधरी, द्वितीय- जयेश पाटील, पाच किलोमीटर चालणे- प्रथम-कृष्णा पाटील, द्वितीय- ऋषिकेश पाटील, चार बाय शंभर मीटर रीले- प्रथम बियाणी मिलिटरी स्कुल, लांब उडी- प्रथम- देवा पवार, द्वितीय- हर्षल वराडे, उंच उडी- प्रथम- देवा पवार, द्वितीय- भावेश काकडे, गोळाफेक, प्रथम- जव्वाद खान, द्वितीय- विजय पारधी., थाळीफेक- प्रथम- चेतन खर्चे, द्वितीय- निशांत खंडेराव , भाला फेक- प्रथम- उज्वल कोल्हे, द्वितीय- हुसेन खान, 19 वर्षे आतील प्रथम व द्वितीय आलेले मुले- शंभर मीटर धावणे- प्रथम- उज्वल कोल्हे, द्वितीय- रोशन जाधव, दोनशे मीटर धावणे- प्रथम- भूषण चौधरी, द्वितीय- स्वप्नील भोई , चारशे मीटर धावणे- प्रथम- आकाश शिरसाळे, द्वितीय- दीपक भारुडे, आठशे मीटर धावणे- प्रथम- दिग्विजय दाभाडे, द्वितीय- सचिन भोई, पाचशे मीटर धावणे- प्रथम- विष्णू पारधी, द्वितीय- डिगंबर मेहरे , तीन हजार मीटर धावणे- प्रथम- दिग्विजय दाभाडे, द्वितीय- कल्पेश काळे, शंभर मीटर हर्डल्स – पाच किलोमीटर चालणे- प्रथम तनीश भोसटे, चार बाय शंभर मीटर रीले- प्रथम- बियाणी मिलिटरी स्कूल, थाळीफेक- प्रथम- प्रज्वल पाटील, द्वितीय- शिवराम वाढे, भाला फेक- प्रथम- विष्णू पारधी, द्वितीय- तनय खाचणे, हातोडा फेक- प्रथम- विशाल माळी, द्वितीय- कमलेश माळी.

यांनी पंच म्हणून पाहिले काम
आर.ई.भोळे, एम.के.वाणी, आए.एस.खंडेलवाल, आर.आर.धनगर. व्ही.एस. पाटील, ए.एम.बोरोले, पी.एच.बोरसे., एल.व्ही. नेमाडे. एम.आर.मोरे, वंदना ठोके, रूपा कुलकर्णी, एस.सी.पाटील, बी.एन.पाटील, पी.आर.साखरे,, आर.बी.कुलकर्णी, एस.डी.बावस्कर, सुनील वर्मा, आनंद पाठक आदींनी पंच म्हणून काम पाहिले.