भुसावळ तालुका कबड्डी स्पर्धेत किन्हीच्या सर्वोदय विद्यालयाचा संघ विजयी

0

भुसावळ- तालुका कबड्डी स्पर्धा शहरातील बियाणी मिल्ट्री स्कुलच्या मैदानावर 30 ते 31 दरम्यान झाल्या. या स्पर्धेत किन्हीच्या सर्वोदय विद्यालयाचा संघ विजयी ठरला. उद्घाटन गट शिक्षणाधिकारी महेंद्र धीमते यांच्या हस्ते झाले. संस्थेचे मनोज बियाणी, संगीता बियाणी, राजु पारीख, प्राचार्य डी.एम.पाटील, क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रदीप साखरे, तालुका समन्वयक बी.एन.पाटील, समिती सदस्य रमण भोळे, रूपा कुलकर्णी, प्रा.अशोक निकम, आर.आर धनगर, संजय भटकर यांच्या सह तालुक्यातील सर्व क्रीडाा शिक्षक व खेळाडू उपस्थित होते.

किन्ही विद्यालयाचा संघ विजयी
या स्पर्धेत 14 वर्षाआतील मुलींमध्ये अहिल्या देवी कन्या विद्यालयावर मात करून सर्वोदय हायस्कुल किन्हीचा संघ विजयी ठरला. 17 वर्षीय मुलींमध्ये महर्शी वाल्मीक विद्यालय, वेल्हाळे विद्यालयावर मात करून के.नारखेडे विद्यालयाने विजय प्राप्त केला तसेच 19 वर्षीय मुलींच्या सामन्यात नाहाटा महाविद्यालयाच्या संघावर ामात करुन द.शि विद्यालयाने विजय संपादन केला. मुलांमध्ये 14 वर्षीय गटात सवार्देय हायस्कूल, किन्ही या संघावर मात करून तळवेच्या नेहरू विद्यालयाच्या संघाने विजय मिळवला तर 17 वर्षीय मुलांच्या संघात महात्मा गांधी विद्यालय, वरणगांव संघावर के.नारखेडे विद्यालयाने विजय संपादन केला. तसेच 19 वर्ष मुलांचा गटात पु.ओ.नाहाटा महाविद्यालाच्या संघावर द.शि विद्यालय, भुसावळचा संघाने विजय मिळवला.

यांनी पाहिले पंच म्हणून काम
पंच म्हणून राष्ट्रीय पंच अलेक्झांडर मणी, श्रीकांत चतुर, नयन सागर मणी, आर.बी. कुलकर्णी, आर.बी पाटील, एम.के वाणी, व्ही.एस पाटील, सुनील वर्मा, आनंद पाठक, खंडेलवाल सर, ए.एम.बोरोले, हिंमत पाटील, डी.आर.धांडे यांनी काम पाहिले.