भुसावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे उद्या जोगलखेड्यात बियाण्यांचे वाटप

0

भुसावळ- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्वाभिमान सप्ताह सोहळ्यात बुधवार, 12 रोजी सकाळी 10 वाजता जोगलखेडा येथे ध्वजारोहण व शेतकर्‍यांना चार्‍याचे बी-बियाणे वाटप करण्यात येणार आहे. पदाधिकारी, जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, ग्रा.पं.सदस्य व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परीषद सदस्य रवींद्र नाना पाटील यांनी केले आहे.

यावलला आज खाऊ वाटप
यावल- वाढदिवसानिमित्त 12 रोजी सकाळी 11 वाजता सातोद रोडवरील जि.प.शाळेत विद्यार्थ्यांना बिस्कीट व खाऊ वाटपाचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय सेलतर्फे होणार आहे. पदाधिकार्‍यांना उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.