भुसावळ तालुका वकील संघासाठी निवडणूक अधिकारी नियुक्त

0

भुसावळ- भुसावळ तालुका वकील संघासाठी निवडणूक अधिकार्‍यांची 2 रोजी वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.ए.एस.शिरसाठ यांनी नियुक्ती केली. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून अ‍ॅड.भूपेश विश्राम बाविस्कर तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून अ‍ॅड.विनोद प्रल्हाद तायडे, अ‍ॅड.प्रमोद प्रल्हाद तायडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, लवकरच तालुका वकील संघाची निवडणूक होणार असून त्या दृष्टीने तयारीला वेग आला आहे.