भुसावळ : तालुक्यातील एका गावातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
वरणगाव पोलिसात गुन्हा
भुसावळ तालुक्यातील एका गावात 14 वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. रविवार, 10 एप्रिल रोजी रात्री 11 ते मध्यरात्री 1.30 वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. पीडीत मुलीच्या नातेवाईकांनी परीसरात शोधाशोध घेऊन तपास सुरू केला परंतु मुलगी कुठेही आढळून आली नाही. याबाबत पीडितेच्या आईने वारणगाव पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने अज्ञात व्यक्तीविरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार नरसिंग चव्हाण करीत आहे.