आमदार संजय सावकारे यांच्या पाठपुराव्याला यश ; तीन कोटी 30 लाखांचा निधी मंजूर
भुसावळ- भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील खड्डेमय रस्त्यांचे चित्र लवकरच पालटणार असून त्यासोबत सामाजिक सभागृह, पेव्हरब्लॉकसह अन्य विकासकामे होणार असल्याची माहिती आमदार संजय सावकारे यांनी दिली. विकासकामांसाठी दोन कोटी 80 लाखांचा निधी मंजूर झाला असून तांडा वस्ती योजनेंतर्गत तब्बल 50 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याकामी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे आपण आभारी असल्याचे आमदारांनी सांगत लवकरच विकासकामांना सुरुवात होईल, असेही ते म्हणाले.
या कामांना मिळाली मंजुरी
ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत 2 कोटी 80 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेंतर्गत 50 लक्ष रुपये किमतीच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. या विकासकामांमध्ये तळवेल येथील पाण्याची टाकी ते शाळेपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, बेलखेडा येथे अंतर्गत रस्त्यांचे कामे, कुर्हे येथील स्मशान भूमीमध्ये बैठक व्यवस्था, कंडारीतील प्रभाग पाचमधील सर्वे नंबर 132/1,132/25 मध्ये रस्त्याचे डांबरीकरण, ओझरखेड येथील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, शिंदीत रस्त्याचे डांबरीकरण, बेलखेडा येथे रस्ते अंतर्गत काँक्रिटीकरण , कन्हाळे बु.॥ येथे व्हीआयपी कॉलनी अंतर्गत रस्ते डांबरीकरण, जाडगाव येथे अंतर्गत रस्ते डांबरीकरण, सुसरी येथे अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, पिंपळगाव येथे वाचनालयाचे बांधकाम, फुलगाव येथे अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, कठोरा बु.॥ येथे सामाजिक सभागृह, गोभी येथील स्मशानभुमी रस्त्याचे डांबरीकरण, आचेगाव येथील नवीन वस्तीतील रस्त्यांचे डांबरीकरण, बोहर्डीत स्मशानभूमीचे बांधकाम तसेच वराडसीम येथील तळेभाग स्मशानभूमीकडे जाणार्या रस्त्याचे डांबरीकरण, वेल्हाळा येथील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, मोंढाळे येथे सामाजिक सभागृह बांधणे, गोजोरे, सुनसगाव, मांडवेदिगर , साकरी ता.भुसावळ येथे अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण, खडके सभागृहाजवळ पेव्हर ब्लॉक बसविणे आदी कामे दोन 80 लाखातून होणार आहेत दरम्यान, वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेतून 50 लाखांचा निधी मंजूर झाला असून त्यातून मांडवेदिगर येथे रस्ता काँक्रीटकरण व गटारीचे बांधकाम, भिलमळी, मुसाळतांडा, महादेव येथेही विविध विकासकामे होणार आहेत.