आमदार संजय सावकारेंच्या नेतृत्वावर मतदारांनी पुन्हा दाखवला विश्वास
भुसावळ :- तालुक्यातील चार ग्रामपंचायतीसह एका ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत मतदारांनी आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत गोजोरेसह सुनसगाव व वराडसीम तसेच निंभोरा येथील पोटनिवडणुकीत कमळ फुलवले तर चोरवड ग्रामपंचायतीत मतदारांनी अपक्ष उमेदवाराला संधी देत भाजपा विचारांना मानणार्या उमेदवाराचा पराभव केला. निकालानंतर उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला
ग्रामपंचायत निहाय सरपंच असे
गोजोरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भूषण प्रकाश कोळी हे 659 मतांनी विजयी झाले. सुनसगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दीपक रामकृष्ण सावकारे हे एक हजार 222 मतांनी तर चोरवडच्या सरपंचपदी रेखा प्रवीण गुंजाळ 694 मतांनी तसेच वराडसीमच्या सरपंचपदी गीता प्रशांत खाचणे दोन हजार 227 मतांनी विजयी झाल्या. पिंप्रीसेकमच्या पोटनिवडणुकीत शोभा सुरेश पवार या 475 मते मिळवून विजयी झाल्या.