आवश्यक साधन सामुग्री वहन करण्यासाठी निर्णय
भुसावळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक साधन सामुग्रीचे वहन करण्यासाठी विशेष पार्सल गाडी चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ज्यांना आवश्यक सामुग्री पाठवयाची असेल त्यांनी आपल्या जवळपासच्या स्टेशनमधील मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
भुसावळ ते न्यू गुवाहाटी विशेष पार्सल गाडी
डाऊन 00139 भुसावळ-न्यू गुवाहाटी विशेष पार्सल गाडी ही 14 रोजी भुसावळ येथून 10 वाजता रवाना होवून 16 रोजी गुवाहाटी येथे 9 वाजता पोहोचणार आहे.
न्यू गुवाहाटी-भुसावळ विशेष पार्सल
अप 00140 न्यू गुवाहाटी-भुसावळ विशेष पार्सल ही 16 रोजी गुवाहाटी येथून 11.30 वाजता रवाना होवून 18 रोजी 11.20 वाजता भुसावळ येथे पोहोचणार आहे. या गाडीला नागपूर, दुर्ग, बिलासपूर, झारसुगुडा, टाटानगर, मालदा टाउन, न्यू जलपाईगुडी, न्यू बोगाईगाव येथे थांबा देण्यात आला आहे.