भुसावळ ते पुणे जाण्यासाठी स्वातंत्र रेल्वे सुरू करण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

यावल ( प्रतिनिधी ) गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत असलेल्या भुसावळ ते पुणे एक्सप्रेसची स्वप्नपूर्ती लवकर करण्यात यावी आता ही एक्सप्रेस लवकरात लवकर सुरू करावी, भुसावळ, रावेर, सावदा, यावल, जामनेर, जळगांव सह जिल्हयातून पुण्याला जाणान्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. या मार्गावर रेल्वे गाडया उपलब्ध असल्या तरी त्या पुरेशा नाहीत. यामुळे खाजगी वाहतुकदाराच्या मनमानीपणामुळे प्रवाशी हतबल झाले आहे. विशेष करून सणासुदीचा काळामध्ये लक्झरी बस चालक हे अव्वाच्या सव्वा दर आकारणी करत असल्याने प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसत असतो. यामुळे या मार्गावर एक्सप्रेस ट्रेन सुरू करावी अशी मागणी आम्ही मनसेकडून कधीपासूनच करण्यात येत आहे. खर तर भुसावळ ते पुणे हुतात्मा एक्सप्रेस ही रेल्वे गाडी प्रवाशांसाठी अतिशय गोर गरीबांसाठी उपयुक्त असली तरी अनेकदा ही चालू-बंद अवस्थेत असल्याने प्रवाशांची मोठया प्रमाणात गैरसोय होत असुन तसेच ही रेल सेवा कल्याण पनवेल मार्गाने पुण्याला जाते , यामुळे मनमाड -दौंड मार्गाने पुण्याला जाणाऱ्यांसाठी हुतात्मा एक्सप्रेस सोयीची नसल्याचे निवेदनात म्हटले आहे . तरी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीने सर्व बाबींचा विचार करून सदरची भुसावळ पुणे रेल सेवा किमान दिवसातुन एक वेळेस तरी सुरू करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र जनहित विभागाचे उपाध्यक्ष चेतन अढळकर यांनी निवेदनाव्दारे रेल्वे विभागाचे रेल प्रबंधक यांच्याकडे केली आहे . यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष किशोर नन्नवरे , शहर उपाध्यक्ष कुणाल बारी,भुसावळ शहर अध्यक्ष राहुल सोनटक्के, तालुका उपाध्यक्ष शाम पवार उपस्थित होते .