भुसावळ- भुसावळातील धान्य गोदामातील तत्कालीन शिपाई व हल्ली बोदवडमध्ये सेवावर्ग शिपाई अकबर खान नादरखान पठाण यांना पदावरून कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात आले असून त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत. या संदर्भात भुसावळातील दिनेश उपाध्याय यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. प्रशासनाने भुसावळ गोदामाची तसेच कार्यालयाची तपासणी केल्यानंतर त्यात अनेक अधिकार्यांच्या नावे माहिती अधिकारात अर्ज तसेच स्वस्त धान्य दुकानदारांच्या नावाची कागदपत्रे आढळली होती. उपाध्याय यांनी निरंतर स्थानिक व वरीष्ठ स्तरावर तक्रारी केल्यानंतर प्रशासनाने चौकशी करीत अकबर खान यांना खात्यातून बडतर्फ केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्या स्वाक्षरीचे आदेश प्रांताधिकार्यांसह खान यांना पाठवण्यात आले आहेत.