भुसावळ : आषाढी एकादशीच्या निमित्ताने भुसावळ येथून पंढरपूरसाठी विशेष गाडी भुसावळ जंक्शनवरून 9 जुलैला दुपारी 1.30 वाजता सुटणार असून ती दुसर्या दिवशी पहाटे 3.30 वाजता पंढरपूर येथे पोहोचेल तर परतीच्या प्रवासात ही गाडी पंढरपूर येथून रविवार, 10 जुलैला रात्री 10.30 वाजता सुटून भुसावळात सोमवारी दपारी एक वाजता पोहोचणार आहे. या गाडीला जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, अंकाई, कोपरगाव, बेलापूर, नगर, दौंड, या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. या गाडीसाठी खासदार रक्षा खडसे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता.
अशी आहे प्रवाशांसाठी व्यवस्था
भुसावळ-पंढरपूर या विशेष रेल्वे गाडीला एकूण 18 डबे असतील तर भुसावळ येथूनच ही गाडी सुटणार आहे. या गाडीत 14 डबे हे जनरल सेटींग खुर्चीचे असतील तर दोन डबे स्लिपरचे असतील शिवाय दोन डबे हे एसएलआरडीचे असतील. भुसावळ ते पंढरपूर दरम्यानचे भाडे हे 185 रुपये असेल. ज्येष्ठ नागरीकांना तिकीटात सवलतीची सुविधा मिळालेली नाही नसल्याने ही सुविधा सुरू करण्याची मागणी होत आहे.