जन्मोत्सवाचे औचित्य साधून तापी नदीकाठावर वृक्षारोपण कार्यक्रम
भुसावळ- तापी उत्थान उत्सव सेवा समिती, नॅशनल युथ क्लब, सप्तश्रृंगीमाता बहुउद्देशीय संस्था बालाजी महिला बचत गट, राजस्थानी महिला मंडळ, बजरंग भजन मंडळ, राधाकृष्ण प्रभात फेरी, देवीदास नामदेव भोळे महाविद्यालय आदी संस्थांतर्फे भुसावळ शहरात तापी नदीचा जन्मोत्सव इंजिन घाट तापी नदीकिनारी जल्लोषात साजरा करण्यात आला. हिंदू धर्माच्या ग्रंथानुसार व पुराणानुसार जेवढे महत्त्व नर्मदा, गंगा नद्यांना आहे तेवढेच महत्त्व तापीचे सुद्धा आहे. खान्देशची शेतीच नाही तर समाजजीवन समृद्ध करणार्या जीवनदायी तापी माईच्या भुसावळ शहराला लाभलेल्या वरदानाला व उपकाराला लक्षात घेऊन गुरुवारी सकाळपासून सर्व संस्थांच्या कार्यकर्त्यांनी तापी जन्मोत्सव सोहळा साजरा केला.
यांची होती उपस्थिती
गुरुवारी सकाळी 10.30 वाजता तापी नदीच्या पुजेला जयप्रकाश शुक्ला यांनी सुरुवात केली. पुजेमध्ये संस्थापक अध्यक्ष प्रशांत वैष्णव, मेघा वैष्णव, सत्यनारायण शर्मा, बबलू शर्मा, राजेश भराडिया, उमेश नेवे, निकेश अग्रवाल, अमित रमेशचंद्र अग्रवाल, दिनेश महाजन आदी सपत्नीक सहभागी झाले होते. यानंतर महाआरती व नदीची ओटी भरून पूजा केली.यावेळी तापी उत्थान एवं उत्सव सेवा समिती आणि सर्व संस्थांचे कार्यकर्ते सहपरिवार, मित्र मंडळींसह भाविक उपस्थित होते.
तापी नदीला 108 मीटर साडीची लांबी अर्पण
यावर्षी उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे तापी नदीला 108 मीटर लांब अखंड साडी अर्पण करण्यात आली. ही साडी सुरत येथून शरद खंडेलवाल यांनी दीपकलाल जैन यांच्या हस्ते संस्थेकडे पाठविली होती. उपस्थित भाविकांना पीपल्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजू फालक, प्रा.डॉ.संजय विठ्ठल बाविस्कर, प्रा.आर.बी.ढाके, प्रभात फेरीचे राधेश्याम लाहोटी तसेच आर.एस.एस.चे धर्मजागरण प्रमुख नंदुजी गिरजे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमानंतर सर्व भाविकांना निकेश अग्रवाल, अमित अग्रवाल यांच्याकडून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
तापी नदी किनारी वृक्षारोपण
तापी नदी जन्मोत्सवाचे औचित्य साधून तापी काठी मुकेश गुंजाळ, नमो शर्मा, सचिन पाटील, रवी किनगे, दत्तू पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थित सर्व संस्थांचे, मान्यवरांचे, भाविकांचे आभार संस्थापक अध्यक्ष प्रशांत रामदास वैष्णव यांनी मानले.
यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
प्रशांत वैष्णव, दिनेश महाजन, सचिन पाटील, उमेश नेवे, संतोष टाक, जयप्रकाश शुक्ला, पंडित रवी ओम शर्मा, गौरव शर्मा, दत्तू झांबरे, रवी किनगे, पीपल्स महाविद्यालयाचे प्राध्यापकवृंद, सखी श्रावणी संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नेवे, राजस्थानी महिला मंडळाच्या ज्योती शर्मा, बालाजी महिला बचत गटाच्या भारती वैष्णव, अॅड.मेघा वैष्णव, बजरंग भजनी मंडळाचे रवींद्र पुरोहीत, मोंटू वर्मा, गोविंद अग्रवाल, सुकदेवप्रसाद चौरसिया, महेश बारसू फालक, सुरेश शर्मा, राम शर्मा, जे.बी.कोटेचा, संजय दांडगे, प्रवीण नायसे, विमल वैष्णव, नलिनी नेवे, विलास पाचपांडे, बाळकृष्ण झांबरे आदींनी परीश्रम घेतले.