गटनेता उल्हास पगारे, रवींद्र सपकाळे, पुष्पा सोनवणेंसह संतोष चौधरींना पाच वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी
भुसावळ (गणेश वाघ)- पालिकेच्या पहिल्याच सभेत गोंधळ घालून मुख्याधिकार्यांना बाहेर काढण्याची मागणी केल्याप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांनी जनआधारच्या नगरसेवकांवर कारवाईबाबत नगरविकास विभागाकडे प्रस्ताव सादर करीत उभयंतांविरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या प्रस्तावावर चर्चा होवून दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जनआधारचे गटनेता उल्हास भीमराव पगारे, रवींद्र सपकाळे, पुष्पा जगन सोनवणे, संतोष चौधरी यांना अपात्र करण्यात आले असून पुढील पाच वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश 20 रोजी नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी काढले आहेत. या आदेशाने पालिकेच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.