मूलभूत सोयी-सुविधा पुरवण्यात पालिका प्रशासन अपयशी
भुसावळ- मूलभूल सोयी-सुविधांअभावी पालिकेची वर्षअखेर अवघी 41.44 टक्के वसुली झाली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात 31 कोटी 54 लाख 10 हजार 118 रुपये कर वसूली अपेक्षित असलीतरी केवळ मार्चअखेर 13 कोटी 7 लाख 28 हजार 407 रुपयांची कर वसुली झाल्याचे सूत्रांनी सांगितले. शासनाच्या निर्णयानुसार अनुदानातील कपात रोखण्यासाठी 100 टक्के करवसूली आवश्यक असलेतरी अपेक्षित वसुली न झाल्याने मुख्याधिकार्यांनी कर्मचार्यांना वसुलीबाबत सूचना केल्या आहेत.
तर प्रशासन करणार कारवाई
शासनाच्या निर्णयानुसार, 100 टक्के करवसुली झाली नाही तर शहराला मिळणार्या अनुदानात कपात होऊन विकासात्मक कामांवर परीणाम होण्याची भीती आहे. नागरीकांनी सहकार्य करून मालमत्ता कर, भोगवटादार, गाळेधारक थकबाकीदारांना आपली थकीत रक्कम भरून, रीतसर पावती घ्यावी अन्यथा थकीत करदात्यांवर पालिका प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी दिला आहे.