भुसावळ पालिकेच्या कर्मचार्‍याचे चौथ्या दिवशीही उपोषण सुरूच

0

भुसावळ- पालिकेतील रोजंदारी कर्मचारी तसेच 23 वर्ष चालक राहिलेल्या अशोक मेहरूमल मोटवानी यांनी न्यायासाठी गुरुवार, 7 मार्चपासून भुसावळ पालिकेबाहेर आमरण उपोषण छेडले आहे. रविवारी तिसर्‍या दिवशीही त्यांचे उपोषण सुरूच होते. शुक्रवारी दुपारी मोटवाी यांचा रक्तदाब वाढल्यानंतर पोलिस प्रशासनाने तातडीने डॉक्टरांना पाचारण केले मात्र उपोषणार्थीने उपचार घेण्यास मनाई करीत न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला होता. नगरपालिका प्रशासनाने रीट याचिकेबाबत वरीष्ठांना योग्य तो अभिप्राय, शेरा न दिल्याने न्याय मिळण्यास विलंब झाल्याने सर्व बाबींची चौकशी करून न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा निर्धार मोटवानी यांनी व्यक्त केला आहे.