भुसावळ पालिकेतील जीर्ण कौलांची चोरी नाही

0

मुख्याधिकार्‍यांचे शहर पोलिसांना पत्र ; शहर पोलिसांनी सोडले वाहन

भुसावळ- पालिकेच्या संत गाडगेबाबा रुग्णालयातून काढण्यात आलेल्या जीर्ण कौलांची चोरीछुपे वाहतूक होत असल्याचा आरोप जनाधारच्या विरोधी नगरसेवकांनी करीत वाहतूक रोखून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी बुधवारी शहर पोलिसांनी पालिकेकडून लेखी अहवाल मागविला होता तर शुक्रवारी शहर पोलिसांनी पालिका प्रशासनाने दिलेल्या अहवालात पालिकेतील जीर्ण कौलांची चोरी होत नसल्याचा अहवाल दिला असून या संदर्भात गुन्हा दाखल करावयाचा नसल्याचे कळवल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. मंगळवारी विरोधकांनी कौलांची वाहतूक रोखून दोषींवर कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणाचा शहर पोलिसांकडून तपास सुरू असताना मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांनी शहर पोलिसांना पत्र दिले असून पालिकेच्या कौलांची चोरी होत नसल्याचे कळवले असून या संदर्भात गुन्हा दाखल करावयाचा नसल्याचे कळवल्याचे शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले म्हणाले. शहर पोलिसांनी जप्त केलेला आयशर ट्रक सोडल्याचे गंधाले म्हणाले.