1 मे रोजी होणार गौरव ; सिंरोचातील कामगिरीची दखल
भुसावळ- भुसावळचे पोलिस उपअधीक्षक गजानन तुळशीराम राठोड यांनी गडचिरोलीतील सिंरोचा येथे दोन वर्षांच्या सेवेत दरोडेखोरांच्या टोळ्यांविरुद्ध केलेल्या धडक कारवाईची दखल घेत त्यांना पोलिस महासंचालक चिन्ह जाहीर करण्यात आले आहे. 1 मे रोजी त्यांना जळगाव येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते हे चिन्ह प्रदान केले जाणार आहे. राठोड यांना पोलिस महासंचालक चिन्ह जाहीर झाल्याने त्यांच्यावर सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.