भुसावळ : भुसावळ पोलीस उपअधीक्षक कार्यालयासह तालुका पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकन मिळाल्याने कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. 18 ते 21 ऑगस्टदरम्यान आयएसओ पथकातील अधिकार्यांनी इमारतींचे परीक्षण केले. कार्यालयामार्फत नागरीकांना देण्यात येणार्या सेवांचा दर्जा, कार्यालयातील अभिलेखांचे अध्यावती करण/अभिलेखाचे जतन करणे, मुद्देमाल जतन करणे, कार्यालयातील भौतीक सुविधा व पोलीस स्टेशन इमारतीतील तसेच परीसरातील स्वच्छता, पोलीस स्टेशन आस्थापणेवरील अंमलदार यांना व देण्यात येणार्या सुविधा, सामाजिक पोलिसींग, पोलीस स्टेशनमधील तपास कार्य व गुन्हयातील जप्तं मुददेमाल व्यवस्थीत ठेवणे, कायदा सुव्यवस्था या मुद्यांवर परीक्षण करून मंगळवारी पोलीस उपअधीक्षक कार्यालयासह भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला यांना आयएसओ मानांकन प्रमाण पत्र बहाल करण्यात आले.
कर्मचार्यांमध्ये आनंद
उप विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना हे प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. कार्यालयीन स्टॉफ, त्याचप्रमाणे भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहा.निरीक्षक रुपाली चव्हाण व अमोल पवार व कर्मचार्यांनी याकामी परीश्रम घेतले.
सर्वांच्या परीश्रमाचे चीज झाले -निरीक्षक कुंभार
भुसावळ तालुका पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकन मिळाल्याचे समाधान असून सर्वांच्या परीश्रमाचे चीज झाले असल्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार म्हणाले.
आयएसओ मिळाल्याचा आनंद : पोलीस उपअधीक्षक
भुसावळ उपअधीक्षक कार्यालयासह तालुका पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकन मिळाल्याचा आनंद असून यापुढे आयएसओ मानांकन कायमस्वरूपी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले.