भुसावळ:- वनाधिकार कायद्याच्या हक्कासाठी, सातबारा मिळवण्यासह कायद्याच्या अंमलबजावणीत होत असलेल्या अन्यायाविरुद्ध जाब विचारण्याच्या मागणीसाठी प्रांताधिकारी कार्यालयावर लोकसंघर्ष मोर्चातर्फे बुधवारी दुपारी दिड वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे. बसस्थानकापासून मोर्चाला सुरुवात होणार असून लोकसंघर्षच्या प्रतिभा शिंदे, चंद्रकांत चौधरी यांच्या नेतृत्वात मोर्चा निघणार आहे.
मोर्चेकर्यांच्या अशा आहेत मागण्या
सर्व वनजमीन धारकांना सात-बारा मिळावा, लोक व प्राणी सहजीवनाने राहतात त्यामुळे धोकाग्रस्त क्षेत्र घोषित करू नये, सामुदायीक वनाधिकार बहाल करण्यात यावे, 12 अ ची चौकशी जनपक्षीय व्हावी, वनपाडे महसूल करावेत, शेतीमालाला हमी भाव मिळावा, दीपनगर विस्थापिताना न्याय मिळावा, वनजमीन धारकांना पीककर्ज मिळावे, गायरान जमीन नावावर करावी, शेतकर्याला पाच हजार रुपये मिळावी आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात सहभागावी व्हावे, असे आवाहन प्रतिभा शिंदे, चंद्रकांत चौधरी यांच्यासह गाढू बारेला, इरफान तडवी, केशव वाघ, सचिन धांडे आदींनी केले आहे.