भुसावळ प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या उपसभापतींवर अविश्‍वास पारीत

0

भुसावळ- प्राथमिक शिक्षक पतपेढीचे उपसभापती भूषण चौधरी यांच्यावर 10 विरूद्ध पाचने अविश्‍वास ठराव पारीत करण्यात आला. चौधरी हे उपसभापतीपदाची मुदत संपल्यावरही पद सोडायला तयार नव्हते. वेळोवेळी सभापती, ज्येष्ठ संचालक मंडळ यांनी समजूत घालून चौधरी यांनी राजीनामा दिला नव्हता. अविश्वास ठरावाच्या बाजूने सुरेश इंगळे, शोभा इंगळे, विजय कोल्हे, कृष्णा सटाले, मधू लहासे, कैलास तायडे, हरीष बोंडे, प्रदीप सोनवणे, निलेश पाटील यांनी मतदान केले तर विरोधात संजय चौधरी, सतीश चौधरी, विनोद पाटील, ज्योती साठे, भूषण चौधरी यांनी मतदान केले. अविश्वास ठराव प्रस्ताव दाखलची प्रक्रिया सहायक निबंधक जोखदंड यांनी पार पाडली. लवकरच उपसभापती पदाची निवड जाहीर होऊन या पदासाठी रावेर येथील संचालक निलेश पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.