भुसावळ : बाजारपेठ पोलीस ठाण्यातील डीबीमध्ये तब्बल 24 कर्मचारी असतानाही वर्षभरात गुन्ह्यांची उकल होत नसल्याची बाब सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी गांभीर्याने घेत डीबी कर्मचार्यांची शुक्रवारी चांगलीच झाडाझडती घेतली. डीबीतील तब्बल 12 निष्क्रीय कर्मचार्यांना हटवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
आता नवीन डीबीमध्ये केवळ तीन हवालदारांसह नऊ कॉन्स्टेबल व नायक राहणार आहेत तर पोलीस उपनिरीक्षक मनोज ठाकरे डीबी प्रमुख असतील. बाजारपेठ हद्दीतील घरफोड्या रोखण्यासह हद्दीत आलेल्या हद्दपार आरोपींवर कारवाई करणे तसेच मालमत्तेसंदर्भातील गुन्ह्यांचा उलगडा करण्यासह डिटेक्शनला या कर्मचार्यांना प्राधान्य द्यावे लागणार आहे.