भुसावळ- भारतीय जनता पार्टीतर्फे लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर रविवारी विजयी संकल्प रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून संघटन वाढीचे प्रयत्न करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या आदेशानुसार या उपक्रम राबविण्यात आला.
आमदारांच्या नेतृत्वात रॅली
भारतीय जनता पार्टी भुसावळ तर्फे रविवारी आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गाने ही रॅली निघाली. लोकसभा निवडणूकीच्या पूर्वी विजयी संकल्प रॅलीतून संघटन शक्ती मजबूत करणे या रॅलीचा उद्देश होता. यावेळी नगराध्यक्ष रमण भोळे, संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे आदींची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील तापीरोड, बाजारपेठ पोलिस ठाणे व अन्य प्रमुख मार्गाने रॅली नाहाटा महाविद्यालयाजवळ पोहचून समारोप करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे, तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, सरचिटणीस पवन बुंदेले, रमाशंकर दुबे, नारायण कोळी, भालचंद्र पाटील, युवराज लोणारी, प्रमोद सावकारे, महिला जिल्हाध्यक्ष शैलजा पाटील, माजी सभापती सुनील महाजन, नगरसेवक निर्मल कोठारी, अॅड.बोधराज चौधरी, राजेंद्र नाटकर, किरण कोलते, देवेंद्र वाणी, दिनेश नेमाडे, प्रा. दिनेश राठी, मनोज बियाणी, राजेश पारीख, सुमित बर्हाटे, हिमांशु दुसाने, अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.