उपसभापती प्रदीप सोनवणे, संचालक निलेश पाटील व कैलास तायडे यांची मागणी
भुसावळ : शहरातील प्राथमिक शिक्षक नूतन सहकारी पतपेढी भुसावळ मध्ये उपसभापतीपदाचा राजीनामा मंजुर करून इतिवृत्ताला राजीनाम्याची नोंद न घेता उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. ज्यासाठी उपसभापती पदाचा राजीनामा दिला त्या बेकायदेशीर भरती प्रक्रियेची चौकशी करण्यात आली नाही तसेच मुळात बदल्या झालेल्या नसतांना दोन जागा वाढीसाठी बदल्यांचा आधार घेतला असल्याची माहिती उपसभापती प्रदीप सोनवणे, संचालक निलेश पाटील व कैलास तायडे यांनी शनिवारी पत्रकार परीषदेत दिली.