भुसावळ येथे लोकन्यायालयात 104 दावे निकाली

0
दावा दाखलपूर्व प्रकरण 291 प्रकरणे निकाली ; 15 लाख 50 हजारांची दंड वसुली
भुसावळ :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व भुसावळ अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या संयुक्त विद्यमाने रविवारी शहरात झालेल्या लोकन्यायालयात प्रलंबित 556 पैकी 104 दावे निकाली काढण्यात आले. लोकन्यायालयासाठी सकाळपासून पक्षकारांची मोठी गर्दी झाली होती. या  दाव्यातून 87 लाख 12 हजार 195 रुपयांची तडजोड करण्यात आली. लोकन्यायालयात भुसावळ व बोदवड ग्रामीणच्या दावा दाखलपूर्वच्या चार हजार 227 प्रकरणातू 291 दावे निकाली काढण्यात आले तर या माध्यमातून 15 लाख 47 हजार 260 रुपयांची रक्कम वसुल करण्यात आली.
तीन पॅनलमध्ये चालले कामकाज
लोकन्यायालयाचे कामकाज तीन पॅनलमध्ये चालले. पहिल्या पॅनलमध्ये अनुक्रमे जिल्हा न्यायाधीश पी.आर.क्षित्रे, न्या.आर.आर.भागवत व न्या.एस.एल.वैद्य यांचा समावेश होता तर पंच म्हणून अपर्णा काटकर, भूषण पाटील, नीता पाटील, विनोद तायडे, अभिजीत ओक, कल्पना टेमानी यांनी सहकार्य केले. यशस्वीतेसाठी किशोर पिंगाणे, एस.एल.तेलंग, पी.सी.नगरकर यांनी परीश्रम घेतले.