भुसावळ येथे लोक अदालतीत 159 खटल्यांचा निपटारा

0

भुसावळ- शहरातील न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीत प्रलंबीत आणि दावा दाखल पूर्व असे एकूण चार हजार 73 खटले ठेवण्यात आले पैकी 159 खटल्यांचा निपटारा होऊन त्यात एक कोटी 82 लाख 90 हजार 512 रुपयांच्या रक्कमेची तडजोड करण्यात आली. चार पॅनलची नियुक्ती करण्यात आली होती. यात पहिल्या पॅनल प्रमुख म्हणून अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी.डोरले, पॅनल दोनचे प्रमुख तदर्थ जिल्हा न्यायाधीश आर.आरभागवत, पॅनल तीनचे प्रमुख म्हणून सह दिवाणी न्यायाधीश डी.एम. शिंदे पॅनल चारवर सह दिवाणी न्यायाधीश एस.एल. वैद्य हे होते. लोक न्यायालयात अ‍ॅड. मिनल पाटील, अ‍ॅड. राजेद्र भतोडे, अ‍ॅड. वैशाली चौधरी, अ‍ॅड. दिनेश चव्हाण, अ‍ॅड. संगीता चंदन, अ‍ॅड. स्वप्नील सोनार, अ‍ॅड. ऐश्वर्या आठवले, अ‍ॅड. दिपक कोळी यांनी पंच म्हणून काम पाहिले. जिल्हा न्यायाधीश पी.आर. शित्रे, तालुकावकील संघाचे अध्यक्ष व सदस्य तसेच गटविकास अधिकारी व्ही.एन. भाटकर, बोदवड येथील गटविकास अधिकारी आर.ओ. वाघ, न्यायालयातील अधीक्षक जे. व्ही. जोशी, तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी पी.एम. काळे, एस.एस. परसे, सी.एन. देशमुख आदी उपस्थित होते.