विविध कार्यक्रमांचे आयोजन : सोमवारी गणरायाचे होणार विसर्जन
भुसावळ- सालाबादाप्रमाणे रेल्वे रनिंग स्टाफद्वारे श्रींची रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक तीनवर तसेच सीवायएम ऑफिस यार्डमध्ये गुरुवारी जल्लोषात स्थापना करण्यात आली. सी.डी.ई.ई. (टीआरओ) पी.पी.भंज यांच्याहस्ते श्रींची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, 14 रोजी मंडलस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. त्यात नांदगाव, बडनेरा, ईगतपुरी, खंडवा, पॅसेंजर तसेच गुडस् लॉबीने सहभाग नोंदवला. 15 रोजी सकाळी 11 वाजता रंगभवनात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तर रविवार, 16 रोजी महिला व मुलांसाठी विविध स्पर्धा तसेच करीअर गाईडन्सवर मार्गदर्शन शिबिर रंगभवनात सकाळी आठ ते पाच दरम्यान होईल. सोमवार, 17 रोजी श्रींचे विसर्जन होईल. सीवायएम ऑफिसपासून तापी नदी किनार्यापर्यंत प्रसंगी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
उत्सवासाठी यांचे परीश्रम
सहा.मंडल विभाग अध्यक्ष सौरभ गोयल, पी.एस.पदम, युनूस खान, ए.टी.खंबायत, आर.वाय.भोळे, ए.के.कुलकर्णी, एम.एस.इंगळे, जी.एस.पाटील, वाय.डी.ढाके, एम.पी.चौधरी, जी.आर.वराडे, गोकुळ महाजन, योगेश चोपडे, डी.बी.महाजन, पी.एस.आवारकर, पी.एन.करसाळे, के.पी.चौधरी, एन.के.धांडे, आर.एम.चौधरी, एन.डी.सरोदे, एन.बी.बारी, जे.एस.सोनवणे, पी.जी.तांबोळी, पी.आर.पाटील, एस.आर.पाटील, पी.पी.भंगाळे, किरण धांडे, वाय.ए.कोल्हे, जे.एस.पाटील, मुर्तूजा अली, जी.ए.पाटील, के.पी.हिरे, रमाकांत चौधरी परीश्रम घेत आहेत.